जळगाव राजमुद्रा दर्पण । मानसिक दुर्बलता नष्ट होऊन जीवन सुकर करीत आत्मिक बळ मिळावे यासाठी मेहरुण येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्या प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे दि.२५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले. गुरुवारी श्रीमद् भागवत कथा पूजनाने किर्तन सप्ताहाला उत्साहात प्रारंभ झाला आहे.
माजी महापौर नितीन लढ्ढा आणि माजी नगरसेविका अलकाताई लढ्ढा यांच्या हस्ते श्रीमद् भागवत ग्रंथ पूजन झाले. संतांच्या प्रतिमेसह माजी नगरसेवक सुभद्राताई व सुरेश नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी बोदवड तालुक्यातील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांच्यासह श्रीमद् भागवत कथेतील सर्व सहकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रभागातील नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य व सप्ताह आयोजक प्रशांत नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी उपस्थित होते. प्रसंगी महाआरती करण्यात आली. मेहरूण प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्ताह यशस्वी होण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, श्रीराम तरुण मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ, जय जवान मित्र मंडळ, जय दुर्गा ग्रुप, साई दत्त ग्रुप, वंजारी युवा संघटना, श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे कर्मचारी तसेच मेहरुणचे ग्रामस्थ यांनी परिश्रम घेत आहेत.