पुणे राजमुद्रा दर्पण। आरोग्य विभागाकडून गट क आणि गट ड संवर्गातील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. आरोग्य विभागावर परीक्षा रद्द करण्याची नामुष्की देखील ओढावली होती. आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया, परीक्षेतील गोंधळामुळं विद्यार्थी हायकोर्टात गेले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. आरोग्य भरती परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
आरोग्य विभागातील 6 हजार पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील गोंधळ आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. भरतीत झालेल्या गोंधळाबाबत चौकशी करून परीक्षा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलीय. एमपीएससी समन्वय समितीनं अॅड. विशाल कदम यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. परीक्षेचा पेपर फुटल्याचं प्रकरण यासंदर्भात विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. आता विद्यार्थी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात गेले आहेत. विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज किंवा उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.