जळगाव राजमुद्रा दर्पण । शहरात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. तर चांदीच्या भावात वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोने २० रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदी प्रति किलो ५३० रुपयांनी महाग झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या भावात चढ उतार दिसून येत आहे. दि. २६ नोव्हेंबर शुक्रवारी सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४८,५३० रुपये इतका आहे. चांदीचा प्रति किलोचा भाव ६४,६३० रुपये झाला आहे.
२२ नोव्हेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,९७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६७,०९० रुपये असा होता. २३ नोव्हेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६६,०८० रुपये असा होता. २४ नोव्हेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,९७० रुपये इतका आहे. २५ नोव्हेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६४,१०० रुपये इतका आहे. तर आज शुक्रवारी सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४८,५३० रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६४,६३० रुपये झाला आहे.
सध्या सोने खरेदीचा हंगाम सुरू आहे. तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टींचा अवश्य विचार करा. सर्वप्रथम तुम्ही जे दागिने किंवा सोन्याचे उत्पादन घेत आहात, त्यावरील हॉलमार्किंग नक्कीच तपासा. जी तुमची खरेदी योग्य असल्याची खात्री करते आणि तुम्ही योग्य ठिकाणी पैसे देत आहात हे समजून घेते. दुसरी गोष्ट बिलाची आहे. बिलाशिवाय कोणतीही खरेदी करू नका कारण नंतर तोच दुकानदार तुम्ही त्याच्याकडून माल घेतल्याचे नाकारू शकतो.