(राजमुद्रा वृत्तसेवा)
मराठा आरक्षण हा विषय राज्याचा आहे, असे पंतप्रधान मोदींना वाटत आहे, म्हणूनच त्यांची आणि संभाजीराजे छत्रपतींची भेट होऊ शकली नाही, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलून दाखवलं. त्यांच्या वक्तव्यावरून आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
“मनकवड्या चंद्रकांत पाटील यांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत – १. मोदींची विषयांची समज फार कमी आहे. २. मोदींना मराठा आरक्षण हा विषय समजलाच नाही. ३. छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे.” असं सचिन सावंत यांनी ट्विट करून चंद्रकांत पाटलांवर टीकेचा टोला मारला आहे.
काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळेला पत्र पाठवले. पण त्यांनी अद्याप मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही.” असं म्हणत नाराजी व्यक्त केली होती? याबाबत आज पत्रकारपरिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेवर निशाणा साधत सचिन सावंत यांनी ट्विटर वरून टीका केली.