मुंबई राजमुद्रा दर्पण । कोरोना कमी झाला असला तरी देशावर ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे सर्वांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओमिक्रॉनवर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्यात निर्बंध लावावे की लावू नये? नवी नियमावली काय असेल? यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करणार आहे.
तासभर ही बैठक सुरू होती. नव्या व्हेरियंटबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. या बाबतची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. यावेळी सर्वच मंत्र्यांनी नव्या नियमावलीबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा करण्याची सूचना केली. मुख्यमंत्र्यांनीही ही सूचना मान्य केली असून ते लवकरच मोदींशी या विषयावर चर्चा करणार असल्याचं सांगितलं.
शाळा सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभाग घेणार आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती, ओमिक्रॉनचा संभाव्य धोका आणि बदलते हवामान याचा विचार करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारने येत्या 1 डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शाळा सुरू होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असतानाच ओमिक्रॉनच्या धोक्याची चाहूल लागल्याने आता शाळा सुरू करण्याबाबत विचार करूनच निर्णय घेण्यात येतील.