जळगाव राजमुद्रा दर्पण । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम यांचा विवाह सोहळ्यासाठी सोमवारी पाळधी येथील बाबा साईबाबा मंदिराच्या आवारात वधूवरांना आशीर्वाद देताना गिरीश महाजन यांनी विवाह सोहळ्याला उपस्थिती महाविकास आघाडीचा चांगलाच कोपरखळ्या आणल्या सोहळ्याला राज्यातील राज्य मंत्रिमंडळातील डझनभर मंत्र्यांनी उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद दिले. यामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री दादा भुसे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, उद्योग व खाणीकर्म मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण राज्यमंत्री ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते.
यावेळी गिरीश महाजन यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील याना टोला लगावला ते म्हणाले कि, २५ वर्षापासून राज्यात शिवसेना-भाजप युतीचा चांगला संसार सुरू होतात. मात्र जयवंतराव तुम्ही आमचा 25 वर्षांचा संसार मोडला मोडून टाकला असा टोला माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना लगावला. माजी मंत्री गिरीश महाजन यांना उत्तर देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, राज्यातील भाजपचे सरकार केल्यामुळे गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या मंत्र्यांची खत अद्यापही संपलेली दिसून येत नाही. त्यामुळे लग्नसोहळे असो वा इतर कार्यक्रम त्या त्या ठिकाणी हे मनातली खदखद बाहेर काढण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच गिरीश महाजन यांच्या कोणत्याही वक्तव्याला आम्ही गांभीर्याने घेत नसून त्यांचा जास्त महत्त्व देण्याची गरज नसल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.