जळगाव राजमुद्रा दर्पण । सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी सेवक सेवाभावी संस्था जळगावच्या वतीने महाराष्ट्र गौरव पुरस्कारचे व सेवक सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी पदग्रहण सोहळ्याचे २६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी कार्य करणाऱ्या वैद्यकीय, आरोग्य, स्वच्छता कर्मचारी यांच्या कर्तुत्वाचा सन्मान म्हणून महाराष्ट्र गौरव पुरस्कारचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, पोलिस कर्मचारी, पत्रकार, शैक्षणिक, साहित्यिक, क्रिडा औद्योगिक, प्रर्यावरण, तसेच आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला, पुरूष, युवक, युवती यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार ने सन्मानित करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी ३० नोव्हेंबर पर्यंत आपले प्रस्ताव पाठवयाचे सेवक सेवाभावी संस्थाच्या कार्यालयात पाठवयाचे आहें.
सेवक सेवाभावी संस्थाच्या वतीने मागील वर्षी कोरोना महामारीमध्ये कार्य करणाऱ्या समाज सेवकांचे महाराष्ट्र गौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. अशी माहिती सेवक सेवाभावी संस्था चे अध्यक्ष विशाल शर्मा यांनी दिली.