मुंबई राजमुद्रा दर्पण। गेल्या आठवड्यात ओमिक्रॉनच्या सावटाखाली जागतिक शेअरबाजार घसरून गेला होता. सेन्सेंक्समध्ये मोठी पडझड झाल्याची पहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये तब्बल 16 हजार अंकांची घसरण झाली होती. परंतु मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये या आठवड्यात शेअरबाजारासाठी दिलासादायक वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. आज शेअर मार्केट सुरू होताच. सेन्सेक्समध्ये तब्बल 700 अंकांची वाढ पहायला मिळाली.
बँकिंग, ऑटोमोबाईल, मेटल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. एचडीएफसी, इन्फोसिस, यांचे शेअर्स टॉपवर आहेत. सध्या स्थितीमध्ये सेन्सेक्स 487 अकांच्या वाढीसह 57,552 अंकांवर स्थिरावला आहे. तर दुसरीकड निफ्टीमध्ये देखील 147 अकांची वाढ झाली आहे. शेअर्समधील खरेदी वाढत असून, गुंतवणूकदार बँकिंग आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला सर्वाधिक पसंती देत आहेत. याचाच परिणाम म्हणून ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी असल्याचे पहायाला मिळत आहे.