जळगाव राजमुद्रा दर्पण । दोन दिवसांच्या वाढीनंतर आज जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या भावात किंचित घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदी देखील स्वस्त झाली आहे. आज सोने ३० रुपयाने कमी झालं. तर चांदी १९० रुपयाने स्वस्त झाली आहे.
सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आकारले जाते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते. मंगळवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,६९० रुपयांवर गेला आहे. तर चांदी भाव १० रुपयांनीवाढून ६२,९०० प्रति किलो झाली आहे.
२९ नोव्हेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,५०० रुपये असा होता. ३० नोव्हेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,०८० रुपये असा होता. १ नोव्हेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७२० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,०९० रुपये इतका आहे. २ नोव्हेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,६९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,९०० रुपये इतका आहे.
जगभरात आता ‘ओमिक्राॅन’ वेरिएंटमुळे मोठी खळबळ पसरली आहे. सर्वांच्या मनात भीती निर्माण झालेली आहेत. या सर्वांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर देखील होणार असं सांगितलं जात आहे. त्यामुळे सोनेचांदीच्या भावात वाढ होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. तरी सोने खरेदीसाठी नागरिकांना चांगला काळ आहे.