मुंबई राजमुद्रा दर्पण। आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्याला उबर कंपनीकडून 2.05 कोटी रुपयांचं वार्षिक पॅकेज दिलं आहे. तर, आयआटी रुरकीच्या विद्यार्थ्याला आंतरारष्ट्रीय टेक फर्मकडून 2.15 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं गेलं आहे. तर आयआयटी गुवाहटीच्या विद्यार्थ्यांना 2 कोटी रुपयांचं पॅकेज देण्यात आलं आहे.
आयआयटी संस्थांमधील कॅम्पस प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशीचं गतवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात जॉब आणि पॅकेजस विद्यार्थ्यांना देण्यात आली. गतवर्षी सर्वाधिक पॅकेजची रक्कम अमेरिकेतील आयटी फर्म कोहेस्टी यांनी 1.54 कोटी रुपये दिलं होतं. ते पॅकेज देखील आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यालाच मिळालं होतं. तर, भारतातील स्थानिक कंपन्यांकडून सर्वाधिक 62 लाख रुपयांचं पॅकेज देण्यात आलं आहे. आयआयटी रुरकीच्या 11 विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयांपर्यंतचं पॅकेज मिळालं आहे. तर, आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांना पहिल्या सर्वाधिक जॉब मिळाले.
मायक्रोसॉफ्ट, क्वालकॉम, गुगल, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, एअरबस, अमेझॉन, अॅपल, एपीटी पोर्टफोलिओ बजाज ऑटो लिमिटेड, उबर आणि रुब्रिक या कंपन्यांचा समावेश होता. उत्पादन अभियंता, संशोधन आणि विकास, सॉफ्टवेअर अभियंता, हार्डवेअर अभियंता, व्यवसाय विश्लेषक, आर्थिक विश्लेषक, विपणन विश्लेषक, पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, सल्लागार, उत्पादन व्यवस्थापन, डेटा सायन्स इत्यादी पदांवर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.