मुंबई राजमुद्रा दर्पण। बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा हंगाम सुरू असून, एकामागून एक सेलिब्रिटी लग्नाच्या बंधनात अडकत आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ हे देखील 9 डिसेंबरला लग्न करणार आहेत. पण, या लग्नाबाबत रोज नवनवीन अपडेट्स येत आहेत. आता संगीतापासून रिसेप्शनपर्यंत त्यांच्या लग्नाबाबत माहिती समोर आली आहे आलं. दोघांचे लग्न राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये होणार आहे. 4 दिवस हा सोहळा चालणार आहे. लग्नाचे कार्यक्रम 7 डिसेंबरपासून सुरू होतील जे 10 तारखेपर्यंत चालतील.
7 डिसेंबरला संगीत, 8 तारखेला मेहंदी आणि 9 तारखेला लग्नसोहळा होणार आहे. 10 डिसेंबर रोजी मोठा स्वागत समारंभ होईल. विकी आणि कतरिना 6 डिसेंबरला लग्नस्थळी पोहोचणार आहेत. पाहुण्यांच्या यादीबद्दल बोलायचे तर, वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा, रोहित शेट्टी, करण जोहर, शशांक खेतान, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी आणि कबीर खान यांची नावे लग्नाला उपस्थित राहणाऱ्या सेलिब्रिटींची नावे आहेत.