नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । महाविकास आघाडीच्या प्रयोगाद्वारे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन केली आहे. शिवसेना यासाठी 2019 मध्ये एनडीएतून बाहेर पडली. शिवसेना खासदार संजय राऊत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेणार आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत शिवसेना निर्णायक टप्प्यावर पोहचली आहे. संजय राऊत, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना भेटणार आहे. राऊत उद्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी यूपीएवरुन काँग्रेसवर निशाणा साधला होता. ममता बॅनर्जींनी यूपीए आणि काँग्रेस संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला सत्तेतून घालवायचं असल्यासं काँग्रेसची भूमिका महत्त्वाची असल्याचं नमूद केलं होतं. यानिमित्तानं शिवसेना आणि काँग्रेसमधील जवळीक दिसून आली होती. आता शिवसेना खासदार संजय राऊत उद्या राहुल गांधी आणि बुधवारी प्रियंका गांधी यांची भेट घेणार असल्यानं शिवसेना यूपीएमध्ये मध्ये सहभागी होण्याच्या हालचाली वाढल्या असल्याच दिसून येत आहे.