(राजमुद्रा वृत्तसेवा)
बारा सदस्यांची फाईल गहाळ होणे आणि अचानक समोर येण्यावरू राज्यात सध्या जोरदार राजकीय वादळ उठले आहे. या मुद्याला धरून आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आरोप प्रत्यारोप करत शाब्दिक फटकेबाजी केली आहे. बारा सदस्यीय नियुक्तीत राज्यपालांकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
“राज्यपालांच्या कार्यालयात प्रशासकीय ढिसाळपण आहे हे या फाईल प्रकरणाने समोर आले आहे. जयंत पाटलांनी नुकताच गौप्यस्फोट केला की जोपर्यंत याबाबत वरून आदेश येत आणि तोपर्यंत मी कोणतीही कारवाई करणार नाही. असा निर्देश राज्यापालांनीच त्यांना दिला असल्यामुळे राज्यपाल भवन हे भाजपचे कार्यालय झालें आहे” असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. या बारा सदस्यांच्या नियुक्तीला धरून राज्यपाल दिरंगाई करत आहेत. आणि हि वस्तुस्थिती असून समोर आली आहे. असाही टोला नाना पटोलेंनी लगावला आहे. आज दुपारी पत्रकारांशी झालेल्या संवादात ते बोलत होते.
लॉकडाऊन संदर्भात कॉंग्रेसच्या भूमिकेवर उत्तर देतांना पटोले म्हणाले की, “या लॉकडाऊनमुळे सर्वात जास्त नुकसान हे बारा बलुतेदारांचे झाले आहे. त्यामुळे यांचे व्यवसाय हे नियमात बसवून सुरु ठेवायला हवे. बारा बलुतेदार हे अत्यावश्यक सेवेत येतात त्यांन सुविधा मिळायला हवी त्याबाबत कॉंग्रेसच्या भुमिकेतुन मुख्यमंत्र्यांना आजच पत्र देण्यात आले आहे”. असे पटोले यांनी सांगितले.