मुंबई राजमुद्रा दर्पण। मराठी-हिंदी कलाकारांच्या उपस्थितीत पार पडणारी, भव्यदिव्य पारितोषिके असलेली आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी अहमदनगर महाकरंडक 2022 रंगभूमीची रणभूमी ‘उत्सव रंगभूमीचा, नवरसांचा.’ अहमदनगरमध्ये 12 ते 16 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. ही स्पर्धा झी-मराठी च्या सहयोगाने अहमदनगर शहरातील माऊली सभागृहात पार पडणार आहे. राज्यातील हौशी नाट्य संस्था आणि महाविद्यालयांसाठी ही स्पर्धा खुली असेल अशी माहिती अहमदनगर महाकरंडक समितीचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली. याबद्दल सांगताना नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, ‘स्पर्धेचे हे नववे वर्षे आहे. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंतांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले आणि लाभत आहे.
अहमदनगर महाकरंडक स्पर्धेमुळॆ महाराष्ट्रभरातील रंगकर्मींना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे नाट्यकलावंतांना या अहमदनगर महाकरंडक स्पर्धेची उत्सुकता असते.’
दिग्दर्शक महेश मांजरेकर, भरत जाधव, अंकुश चौधरी, केदार शिंदे, सिद्धार्थ जाधव, मंगेश कुलकर्णी, श्रीरंग गोडबोले, सोनाली कुलकर्णी आदीं या स्पर्धेला आत्तापर्यंत पाहुणे म्हणुन लाभले आहेत. तर केदार शिंदे, अमित भंडारी, सुजय डहाके, विजय पाटकर, किरण यज्ञोपवित, प्रवीण तरडे, हेमांगी कवी, सुनील बर्वे, अश्विन पाटील, राजन ताम्हाणे, विकास कदम, मुक्ता बर्वे, विनोद लवेकर हे परिक्षक म्हणून लाभलेले आहेत. 12 ते 16 जानेवारी 2022 दरम्यान अहमदनगर महाकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार असून 1 डिसेंबर 2021 ते 20 डिसेंबर 2021. पर्यंत www.mahakarandak.com या संकेत स्थळावर प्रवेश अर्ज भरावयाचा आहे.