जळगाव राजमुद्रा दर्पण । मंदाकिनी खडसे यांची पुण्यातील भोसरी भूखंड प्रकरणातील कोठडी ईडीने मागितली. या प्रकरणात ईडीला चौकशी करायची असेल तर २४ तासांपूर्वी कल्पना द्यावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच दर शुक्रवारी ईडी कार्यालयात मंदाकिनी खडसे यांना हजेरी लावण्याबाबतचे आदेश न्यायालयाने मागे घेतले आहे. त्यानुसार पुढील सुनावणी २१ डिसेंबर रोजी असून तोपर्यंत अटकेपासून देखील खडसे यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.
एकनाथराव खडसे महसूल मंत्री असताना त्यांच्या जावयाविरोधात भूखंड प्रकरणात काही पुरावे हाती लागले होते. एका प्रकरणात मंदाकिनी खडसेंचाही सहभाग असल्याचं समोर आलं होतं. यावर मुंबई उच्च न्यायालयाने पत्नी मंदाकिनी खडसे यांना दिलेले अंतरिम संरक्षण २१ डिसेंबरपर्यंत वाढवले आहे. मंदाकिनी यांचा ताबा द्यावा अशी मागणी होत असतानाच त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २१ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे.