तामिळनाडू राजमुद्रा दर्पण । तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या घटनेत ११ जणांचा मुत्यू झाला आहे. तर सीडीएस बिपिन रावत गंभीर जखमी झाले आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे संसदेत माहिती देणार असून त्यानंतर ते घटनास्थळी रवाना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरातील हलचाली आता वाढल्या आहेत.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनही सायंकाळी घटनास्थळी जाणार आहेत. हेलिकॉप्टर अपघाताच्या पाहणीसाठी वायुसेनाप्रमुख व्ही. आर. चौधरी घटनास्थळी जाणार आहे. ते रुग्णायातही जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वायुसेनाप्रमुख अपघातस्थळी जाऊन अपघात कसा झाला याची प्रत्यक्ष माहिती घेणार आहे.
माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीडीएस बिपीन रावत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, रावत यांची पत्नी मधुरीका रावतही होत्या. मात्र, यातील अनेक जणांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती हवाई दलाने दिली आहे.