मुंबई राजमुद्रा दर्पण । राज्यातील ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत सापडला होता. त्याचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
हा रुग्ण 33 वर्षांचा अभियंता होता. तो अभियंता असून तो एप्रिलपासून एका व्यापारी जहाजावर गेला होता. त्यामुळे त्याचे कोरोना लसीकरण झालेले नव्हते. त्याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला आता रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्याला सात दिवस घरीच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ओमिक्रॉन संसर्गाचा वेग अतिशय जास्त असून त्याला रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण देखील वेगाने वाढले पाहिजे, या दृष्टीने जेथे लसीकरण कमी आहे. तिथे ते वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यात सध्या कोरोनी लशीचे 12 कोटी 3 लाख 18 हजार 240 डोस दिले आहेत. यातील 4 कोटी 37 लाख 46 हजार 512 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत तर, 7 कोटी 65 लाख 71 हजार 728 लोकांनी एक डोस घेतला आहे.