मुंबई राजमुद्रा दर्पण । मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वरळी सिलेंडर स्फोटप्रकरणात, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पेडणेकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली. याच प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्याविरोधात भादंवि कलम 354 अंतर्गत मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. प्रविण दरेकर म्हणाले की, जे सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना दाबायचे अशी परिस्थिती आहे. हा सूडबुद्धीचा कार्यक्रम सरकारचा आहे. भाजप कार्यकर्ता किती आक्रमक होतो हे दिसेल. संजय राऊत यांच्या विधानाचा आम्ही निषेध करतो. संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.