मुंबई राजमुद्रा दर्पण । तुम्ही अवघ्या एका क्लिकवर एलपीजी गॅस सिलिंडरची बुकिंग करू शकता. इंडेन गॅस एचपी गॅस आणि भारत गॅस अशा प्रमुख कंपन्यांनी तर मोबाईच्या अवघ्या एक मीस कॉलवर गॅस बुकिंग करून देण्याची सुविधा उपलब्ध करू दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही अडथळ्याविना सहज गॅस बुक करता येतो. मात्र आता इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकने देखील आपल्या ग्राहकांसाठी गॅस बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोस्ट पेमेंट्स बँकेकडून याबाबत माहिती देण्यात आली.
आयपीपीबीने या नव्या सुविधेबाबत माहिती दिली आहे. सोबतच एक व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. आता आमच्या ग्राहकांना आयपीपीबी अॅपच्या माध्यमातून गॅस सिलिंडरची बुकिंग करता येणार आहे, हे सांगताना आम्हाला आनंद होत असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. आयपीपीबीच्या अॅपवर बुकिंग करायचे असेल तर आधी तुमच्या मोबाईवर आयपीपीबीचे अॅप डाऊनलोड करा. त्यानंतर त्या अॅपमध्ये तुमचा रजिस्टर नंबर एंटर करा. रजिस्टर नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला ओटीपी मिळेल. ओटीपी मिळाल्यानंतर तो एंटर करा. ओटीपी टाकताच तुमचे अॅप ओपन होईल. या अॅपमध्ये बिल असा एक पर्याय आहे. ज्या मध्ये जाऊन तुम्ही तुमच्या गॅसची बुकिंग करू शकता. गॅसची बुकिंग केल्यानंतर तुम्हाला घरपोहोच गॅस उपलब्ध होईल.