दिल्ली राजमुद्रा दर्पण। देशामधील प्रमुख कार निर्मिती कंपनी टाटा मोटर्सने आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक जानेवारीपासून नवे दर लागू होणार आहेत. कच्च्या मालाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे, तसेच महागाई देखील वाढल्याने दरवाढीचा निर्णय घ्यावा लागत आहे. येत्या एक जानेवारीपासून सर्वच वाहनांच्या किमतीमध्ये अडीच टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात होणार असे समोर येत असलेल्या माहितीप्रमाणे देशातील प्रमुख कार निर्मिती कंपनी असलेल्या टाटाने वाहनांच्या किमती 2.5 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे वाहनांचे उत्पादन बाधित झाले आहे. आता त्यात भरीसभर म्हणजे वाहनांच्या निर्मितीसाठी लागणार कच्चा माला देखील महागाला आहे. वाहनाच्या निर्मितीसाठी लागणार कच्चा माल मोठ्याप्रमाणात आपल्याला आयात करावा लागतो. आंतराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या किमतीमध्ये वाहन विक्री करणे आता कंपन्यांना परवडत नसून, वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका असलेले स्टील, अॅल्यूमिनियम, इलेक्ट्रॉनिक चिफ, अशा सर्वच कच्च्या मालाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तसेच कोरोना काळात सर्वच कंपन्यांना मोठा फटका बसला आहे.