(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा)
शिवाजीनगर पुलात अडथाडा निर्माण करणारे विद्युतपोल स्थलांतरीत करण्यासंदर्भात जळगावात सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी अभिजित राउत यांना भेटून सोमवारी (ता २४) भेट घेऊन रखडलेल्या कामासंदर्भात समिती स्थापन करून बैठक घेण्यात यावी अशी विनंती केली होती. त्यानुसार गुरुवारी (ता २७) याबाबत मिटिंग घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी दिले आहे.
दीपककुमार गुप्ता यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही मेल करून याबाबत विनंती केली आहे. गुरुवारी होणाऱ्या बैठकीत पालकमंत्र्यांच्या अध्क्षतेत सदर बैठक पार पडणार असून याबाबत काय निर्णय घेतला जातो यावर लक्ष असणार आहे. अखर्चित साडेतीन कोटीच्या निधीतून विकासकामांना गती देण्यासंदर्भात हि बैठक घेतली जाणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव मनपाला २५ कोटीचा निधी देण्यासंदर्भात घोषणा केली होती. हा निधी पूर्णपणे खर्च न होऊ शकल्याने त्यातील खर्च न झालेल्या साडेतीन कोटीच्या निधीतून दीड कोटीच्या निधीला पोल स्थलांतरणाच्या कामी मान्यता समितीच्या बैठकीत मिळणार आहे.