जळगाव राजमुद्रा दर्पण। जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ ट्विट करून हे आवाहन केलं आहे. 12 तारखेला होणाऱ्या परीक्षेबाबत अफवा पसरवल्या जात आहे. काही लोक पैसेही घेत आहेत असं ऐकायला आलं तर त्याच्या वर गुन्हा दाखल होईल पोलिसांमध्ये दिलं जाईल. म्हाडाच्या परीक्षेबाबत अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. काही लोक पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका.
कुणालाही पैसे देऊ नका. अफवा अशाच सुरू राहिल्या तर वेळ आल्यास मीच ही परीक्षा रद्द करेन, असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला.