जळगाव राजमुद्रा दर्पण। स्व.वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या वतीने संगीत महोत्सवाचे आयोजन दि. ६, ७, ८, ९ जानेवारी २०२२ रोजी करण्यात येत आहे. यंदाचे हे विसावे वर्ष असल्यामुळे या वर्षी प्रतिष्ठान एक दिवस वाढवून चार दिवसांचा हा महोत्सव करणार आहे. नेहमीप्रमाणे या महोत्सवास जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, भारतीय जीवन विमा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, तसेच संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलावंतांना सहभागी करून घेण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे महोत्सवातील प्रत्येक सत्र हे प्रेक्षणीय व श्रवणीय असणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन दि. ६ रोजी महापौर जयश्री महाजन जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी अभिजित राऊत, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, भारतीय स्टेट बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर मुकेश कुमार सिंग, युनियन बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी जनरल मॅनेजर गिरिजा भूषण मिश्रा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन च्या डेप्युटी जनरल मॅनेजर श्रीमती अंजली भावे, तसेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लि चे झोनल मॅनेजर श्री अग्रवाल यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.