मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । शरीरात कमी प्रमाणात पाण्याचे सेवन केल्यामुळे पचनसंस्थेच्या विकारांना सामोरे जावे लागत असल्याचा घातकी परिणाम दिसून आला आहे. . तुम्ही जेवणापूर्वी अधिक पाणी प्राशन करत असल्यास किंवा जेवणादरम्यान पाणी पिण्याची सवय पचनसंस्थेला हानी पोहोचू शकते. आयुर्वेदा च्या नुसार अशा सवयींमुळे पोटाच्या अन्नाच्या स्थितीवर थेट परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. . पाण्यामध्ये पोटातील शीतलतेचे तत्व सामावलेले असते आणि पोटात उर्जेचे स्वरुप तप्त असते. जेवण करताना पाणी पिल्यामुळे पचन अग्नी शांत होतो. ज्यामुळे अधिकाधिक खाण्याची इच्छा निर्माण होणे अडचणीचे ठरते. एवढंच नव्हे जेवणा आधी पाणी पिण्याच्या सवयीमुळे लठ्ठपणाच्या समस्येला तुम्हाला सामोरे जावे लागू शकते.
खालील प्रमाणे सवयी लावून घ्या..
– एकाचवेळी एक ग्लास कधीही पिऊ नका. सावकाशपणे पाणी प्राशन करा.
-जेवण्यापूर्वी आणि जेवणानंतर तत्काळ पाणी कधीही पिऊ नका. त्यामुळे तुमच्या शरीरातील गॅस्ट्रिक ज्यूसचे विघटन होऊ शकते. ज्यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वांचे पचन व अवशोषणात जटिलता निर्माण होते.
– जर तुम्ही तहानलेले असाल, जेवणापूर्वी आणि जेवणानंतर 30 मिनिटांनी पाणी प्या.
-जेवणावेळी तहान लागल्यास ग्लासभर पाण्याऐवजी एक-एक घोट पाणी प्या.
किडनीवर होतील परिणाम
बहुतांश लोक धावपळीत उभ्यानेच पाणी सेवन करातात . उभ्याने पाणी पिल्यामुळे आरोग्य विषयक जटिल समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते. उभ्याने पाणी पिल्यामुळे शरीराच्या पचनसंस्थेवर मोठा परिणाम जाणवतो. तुमच्या पचनसंस्थेतून थेट मार्गक्रमण होऊन पाण्याचे उत्सर्जन होते. शरीरातील आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांचे पाण्यावाटे मार्गक्रमण होत नाही यामुळे शरीरातील विषारी द्रव्य शरीरात घातक ठरतात. त्यामुळे शरीराला पोषक तत्वांची कमतरता आणि अनावश्यक पदार्थांचे उत्सर्जन करणाऱ्या मूत्राशयाच्या क्रियेचा वेग कमी होतो. मूत्राशय यामुळे निकामी होंण्याची शक्यता अधिक असते.
संपूर्ण दिवसात केवळ एक ग्लास पाणी पिणाऱ्या व्यक्तींना कालांतराने आरोग्याच्या जटिल समस्यांना सामोरे जावे लागते. पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयीचा देखील पचनसंस्थेवर विपरित परिणाम होत असल्याचे संशोधनातून समोर आले असून पाणी पिण्याच्या पद्धतीमध्ये सुधार करणे गरजेचे आहे.