जळगाव राजमुद्रा वृतसेवा | जिल्ह्यात राष्ट्रवादीत फेरबदल होत असल्याच्या बातम्या राजकीय सूत्रांकडून समोर येत आहे. आगामी काळात निवडणुकांचे पडघम वाजण्याचे निश्चित असताना होणारा फेरबदल महत्वपूर्ण मानला जात आहे. यामध्ये निवडणूक पूर्व घडामोडी राष्ट्रवादीत घडवून आणण्यासाठी खडसे गटाने घेतेलेली सक्रियता अनेकांना अस्वस्थ करणारी आहे. मात्र यापूर्वी पक्षासाठी खस्ता खाणाऱ्या काही जुन्या जाणत्या मराठा समाजातील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. ‘आयत्या वेळेत आलेल्यांना पक्षात संधी दिली जाणार मग आम्ही काय कराचे ?’ सत्ता आल्यावर गर्दी होत असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान खडसे गटातील काही जण मुंबईकडे जाण्यासाठी दुपारी निघाल्याचे वृत्त हाती आले आहे.
शहराध्यक्ष पदावर खडसे गटाची वर्णी ?
राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांचा भाजप मधील नेत्यांसोबत आर्थिक हित भागेदारी असल्याचे आरोप करण्यात आले आहे. त्यावरून अभिषेक पाटील यांनी देखील प्रति उत्तर देत कोणाची कोणासोबत भागीदारी आहे हे लवकरच माहिती पडेल असा पलटवार अभिषेक पाटील यांनी केला आहे. यामुळे अधिक वाद पेटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या जागेवर खडसे गटातील अशोक लाडवंजारी अथवा एकाची वर्णी लागेल असा दुजारा देखील राजमुद्राशी बोलताना एका राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यानी दिला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात राष्ट्रवादीत काही दिवसापूर्वी दाखल झालेल्या एकनाथराव खडसे यांचा प्रभाव कायम आहे. त्याचाच फायदा राज्यातील वरिष्ठ नेत्यांना जिल्ह्यात राष्ट्रवादी मजबूत करून घेण्यासाठी करून घ्यायचा आहे. आगामी विधानसभे पूर्वी जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यावर राष्ट्रवादीतील राज्यातील नेत्यांचा भार आहे. त्यामुळे एकनाथराव खडसे सांगतील ती पूर्व दिशा अशी स्थिती आता राष्ट्रवादीत राहणार हे निश्चित आहे.