नशिराबाद राजमुद्रा वृत्तसेवा | आज दिनांक १८-१२-२१ रोजी मा. जिल्हाधिकारी जळगाव व मा.जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव व मा.तालुका वैद्यकीय अधिकारी जळगाव डॉ संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवर्धिनी केंद्र नशिराबाद वैद्यकीय अधिकारी डॉ इरेश पाटील यांचे नियोजनात ५ टीम तयार करू आरोग्य वर्धिनी केंद्र नशिराबाद अंतर्गत नशिराबाद, उमाळा, चिंचोली कुसुम्बा, रायपूर, या गावात महाकोविड १९ लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले याला नागरिकांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद देत कोविशील्ड लसीचा पहिला डोस १९२ व दुसऱ्या डोस १३३८ लाभार्थीनी घेतला अश्या एकूण १५३० लाभार्थीनी महा कोविड १९ लसीकरण शिबिरात एकाच दिवशी लाभ घेतला आहे.
यावेळी आरोग्य वर्धीनी केंद्र नशिराबाद वैद्यकीय अधिकारी डॉ इरेश पाटील यांच्या नेतृत्वातऔषध निर्माण अधिकारी- अशोक पाचपांडे,आरोग्य सहाय्यक- पी.डी. कोळी,आरोग्य सहाय्यीका- सुषमा महाजन,समुदाय आरोग्य अधिकारी- डॉ. तुषार राणे, डॉ. अक्षय पाटील, डॉ विकास जोशी, डॉ. शोएब पटेल, डॉ. शिरीन पाटील, डॉ जयश्री सोनार,
आरोग्य सेवक- सुनील ढाके, प्रकाश पाटील, रवींद्र पवार, शेखर हिवरे, दीपक तायडे, दिलीप ठाकूर,आरोग्य सेविका- भारती कोळी, प्रेमलता पाटील, बफी साळुंके, कोकाटे.
ऑपरेटर- राकेश कुदळे,आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, या सर्व टीमने परिश्रम घेतले.
सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांचे याकामी उत्तम सहकार्य लाभलेआरोग्यवर्धिनी केंद्र नशिराबाद वैद्यकीय अधिकारी डॉ इरेश पाटील यांनी सर्व टीमचे अथक परिश्रम घेतल्या बद्दल कौतुक केले व येत्या काही दिवसात अशाच प्रकारे महा शिबिरांचे नियोजन करून आरोग्यवर्धिनी केंद्र नशिराबाद अंतर्गत येणाऱ्या १९ गावे १००% लसवंत होणार असा विश्वास व्यक्त केला आहे.