जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा | जामनेर ते गारखेडा गावा दरम्यान लाकडाने भरलेल्या आयशर ट्रकने प्रवासी वाहून नेणाऱ्या पॅजो रिक्षाला समोरून धडक दिल्याने २जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारा दरम्यान म्रुत्यु झाला.या अपघातात अजुन १२ जण जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात रवाना करण्यात आले.
आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास लाकडाने भरलेला ट्रक जामनेरकडून (एम.एच.२१/६०४५) भुसावळकडे भरधाव वेगाने जात असताना. तर समोरून भुसावळ वरुन प्रवाशांनी भरलेली रिक्षा (एम.एच.१९/ऐ.ई.९१५८) जामनेरला येत असताना.गारखेडा गावाजवळ एका कापसाच्या जिनींग जवळ भरधाव आयशर ट्रकने पॅजो रिक्षाला समोरून जोरदार धडक दिली. यात तानाजी शंकर साळवी(वय-४७)रा.कल्याण,तारासिंग जयसिंग पाटील(वय-५८)रा.नाशिक हे २ जण जागीच ठार झाले तर शेख मोहम्मद अवेस अमिनोद्दीन, (वय-२७) मुंबई या तरूणाचा उपचारादरम्यान म्रुत्यु झाला.अन्य१२ प्रवासी या अपघातात जखमी झाले असुन त्यांना उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात रवाना करण्यात आले. या घटनेतील तिनही मयत कामानिमित्त बाहेर गावी राहतात. आज सकाळी बाहेर गावाहुन आलेले हे प्रवासी आपापल्या कामासाठी व घरी जामनेर रिक्षाने परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यात या ३ प्रवाशांना आपला जिव गमावावा लागला.घटनेतील मयत झालेला शेख मोहम्मद अवेस अमिनोद्दीन हा युवक मुंबईवरून आज नियोजित आपल्या मामेभावाच्या लग्नासाठी घरी येत होता. विजय अशोक घोटे,पार्वतीबाई पालवे,कवीता पालवे,अलका पालवे,सागर दोडके,शेख चांद शेख नुरा,विष्णू पालवे,मयुर पालवे,भाग्यश्री पालवे,शेख रसुल चांद,अमिनोद्दीन नजमोद्दीन,मनीष जाधव हे प्रवासी या अपघातात जखमी झाले.
अपघात इतका भीषण होता की, यात रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली असून ट्रक देखील रस्त्यावर उलटला असून याचा चालक आणि क्लिनरला देखील दुखापत झाली आहे.अपघातामुळे मार्गावरील वाहतुकीचा काही वेळ खोळंबा झाला. दरम्यान पोलिसांनी प्रशासनाने अपघातस्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली आहे.