उत्तर प्रदेशात सध्या आयकर च्या मोठ्या कार्यवाह्या सुरू आहे. यामध्ये राजकीय नेते आयकर च्या रडारवर असून कोट्यावधी च्या बेहिशोबी मालमत्ता जप्तीच्या कार्यवाही ला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध कानपूरमधील व्यापारी व राजकीय नेते पीयूष जैन यांच्या घरी आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापे मारी केली आहे. . या छापेमारी मध्ये आयकर विभागाच्या हाती कपाटं भरून भरून नोटा सापडल्या आहेत. कुबेरा ऐवढे बेनामी घबाड पाहून आयकर विभागाचे अधिकारी देखील चक्रावून गेले आहेत. समाजवादी पक्षाच्या जवळीक असलेले पीयूष जैन हे कानपूरच्या कन्नौज येथे राहतात. गुरुवारी त्यांच्या कार्यालय आणि घरी छापे मारण्यात आले. यावेळी त्यांच्या घरातील कपाटांमध्ये नोटा खच्चून भरलेले खोके सापडले आहे.
या नोटा एवढ्या मोठ्या प्रमाणात होत्या की आयकर विभाला या नोटा मोजण्यासाठी चार मशीन मागवाव्या लागल्या. समाजवादी पार्टीच्या निकटवर्ती असलेले तसेच अखिलेश यांचे विश्वासू सहकारी असलेले पियुष जैन यांच्यावर या अगोदरच आयकरचा डोळा होता यासंबंधात करण्यापूर्वी छापे टाकण्या पूर्वी पियुष जैन यांच्या मालमत्तेचा तपशील जाणून घेतला होता असे सांगितले जात आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना मोठा धक्का मानला जात आहे.
डीजीजीआयच्या गुजरात आणि मुंबईच्या पथकांनी सकाळी 10 वाजता छापेमारी सुरू केली आहे. जैन हे पान मसाला समूहाचे संस्थापक आहेत. त्यांचा परफ्यूमचाही व्यवसाय आहे. त्यांच्या सात ठिकाणांवर छापेमारी करणअयात आली आहे. या छापेमारीत 150 कोटी रुपयांची अघोषित संपत्तीचा खुलासा झाला आहे. तसेच आयकर विभागाने 90 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. आयकर विभागाने जैन यांच्या कन्नौज येथील घर, कार्यालय, पेट्रोल पंप आणि कोल्ड स्टोरेजवर एकसाथ छापेमारी केली. त्याशिवाय मुंबईतील शोरुम आणि कार्यालयावरही छापेमारी केली आहे.