नवी दिल्ली: उत्तरखंड भाजप सरकारमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजीनाम्याचे नाट्य सुरू झाले आहे. भाजप सरकार मधील हरक सिंग हे उत्तराखंड सरकारचे महत्वपूर्ण कॅबिनेट मंत्री होते. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मतदार संघातील विकास कामांसदर्भात पूर्तता होत नसल्याचा त्यांना राग होता. त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना अर्ध्यावर सोडून बाहेर पडले. ऐवढेच नाही तर बैठकीच्या दरम्यानच त्यांनी राजीनामाही देऊन टाकला. बैठकीतून बाहेर आले अन त्यांना ढसाढसा रडू कोसळले. त्यांच्या आमदारकीच्या काळात पाच वर्षापासून हरकत सिंग रावत यांनी स्वत:च्या क्षेत्रात एका मेडीकल कॉलेजची मागणी केली होती. मात्र सात्यत्याने पाठपुरावा करून देखील त्यांनी केलेली मागणी उत्तराखंड सरकार कडून पूर्ण करण्यात आलेली नाही. यामुळे हरक सिंग रावत यांनी थेट राजीनामा देत बंड पुकारले आहे.
केले गंभीर आरोप
हरकसिंह रावत हे तसे पहिल्यापासून बंडखोर वृत्तीचे मानले जातात. गेल्या पाच वर्षापासून ते त्यांचं क्षेत्र असलेल्या कोटद्वारमध्ये एका मेडीकल कॉलेजची मागणी करत होते. हाच मुद्दा त्यांनी सरकारमध्ये अनेक वेळा मांडला पण केलेली मागणी काही पूर्ण झाली नाही. उत्तराखंडमध्ये अवघ्या काही महिन्यात लागोपाठ मुख्यमंत्री येत राहीले पण हरकसिंह रावत यांच्या मागणीकडे प्रत्येकानं दूर्लक्ष केल्याचं सांगितलं जातंय. शेवटी त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हाच मुद्दा मांडला तर तिथेही त्यांच्या पदरी निराशा पडली. त्यावरुन मग त्याच बैठकीत त्यांनी राजीनामा दिला आणि बाहेर पडले. बैठकीतून बाहेर आल्यानंतर हरकसिंह रावत यांच्या डोळ्यातून अश्रू वहात होते. ते चांगलेच रडत होते. ह्या लोकांनी भिकारी करुन टाकल्याचं वक्तव्यही त्यांनी केल्याचं वृत्त आहे. स्वत:च्याच सरकारनं तेही कॅबिनेट मंत्री असताना
त्यांची मागणी पूर्ण होत नव्हती. त्या अगतिकतेतूनच त्यांना रडू कोसळल्याचं सांगितलं जातंय.