नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 415 वर पोहोचली आहे. यामुळे केंद्रीय यंत्रणेने धोक्याचा इशारा दिला आहे. बाहेर देशातून येणाऱ्या नागरिकांची विमान तळावर विशेष तपासण्या करण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्यापैकी 115 जण ओमिक्रॉनच्या संसर्गातून बरे झाले आहेत. महाराष्ट्र ओमिक्रॉन वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं तपासण्यांमधून समोर आले आहे. यामुळे बाहेर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर करडी नजर ठेवली जात आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 108 वर पोहोचली आहे. तर, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या माहितीनुसार 42 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.