प्रहार जनशक्ति पक्षाचा घणाघात…हे जर खोटं असेल तर अवैध धंदे बंदसाठी सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येण्याचे केले आवाहन
जामनेर राजमुद्रा दर्पण | जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर मतदार संघात राष्ट्रवादी व शिवसेना अवैध धंद्यावरुन एकमेकांवर आरोप करीत आहे तसाच प्रकार जामनेर तालुक्यात आहे .३० वर्षापासून भाजपवाले अवैध धंदे करत आहेत आणि राष्ट्रवादीवाले त्यांच्या नावाने खडे फोडून सर्व काही सेटलमेट करायचं आणि याच धंद्यांना मग संरक्षीत करतात. असा घणाघात प्रहार जनशक्ति पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रदिप गायके विधानसभा क्षेत्र प्रमुख मनोज कुमार महाले, शेतकरी आघाडी चे अन्ना पाटिल , गजानन वाघ यांच्या उपस्थीत झालेल्या पत्रकार परिषदेत केला. आम्ही केलेले आरोप खोटे असतील तर सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी धंदे बंद करणेसाठी आमच्या सोबत यावे असेही आवाहन केले.जामनेर तालुक्यात सर्वच बाजार पेठांची गावांमध्ये तसेच शहरात सर्वच प्रकारचे अवैध धंदे सुरू आहे तसेच या भागातील तक्रारी केल्यानंतर पोलीस अधिकारी त्या ठिकाणी कारवाई करतात परंतु त्यांच्यावर भाजपा राष्ट्रवादी पक्षाकडून राजकीय दबावाचा वापर केला जातो परिणामी पोलीस अधिकारी यांचा नाईलाज होतो.अनेक वेळेला या धंदे वाल्यांच्या बाबतीत पोलीस व राजकीय पदाधिकारी यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद झाल्याचे सर्वांना माहीत आहे अशावेळी या सर्व अवैध धंद्यांना राजकीय पाठबळ प्रबळ होत गेले परिणामी या धंद्यांचे जाळे मजबूत होऊन ते निगरगठ्ठ झाले आहेत. अशावेळी प्रहार जनशक्ती पक्षाने या अवैध धंदे बंद करण्याचा विडा उचलला असून सर्वप्रथम या अवैध धंद्यांना ज्यांचे संरक्षण आहे आणि भाजपा व राष्ट्रवादीची कशी मिलीभगत आहे हे आम्ही समोर आणणार आहोत तर जर आमच्या आरोपात काही तथ्य नसेल तर मग त्यांनी आमच्यासोबत या अवैध धंदे बंद करण्याच्या आंदोलनात सोबत यावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आले तसेच कायद्यामध्ये अवैध धंदेवाल्यांना लगाम लावण्यासाठी जे काही प्रावधान असेल त्याचा वापर पोलीस प्रशासनाने करावा त्यासाठी सर्वतोपरी पोलिस प्रशासनाच्या पाठीमागे उभे राहण्याची जनशक्ती पक्षाची तयारी आहे आज आम्ही प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून तोंडी स्वरूपात अवैध धंदे बंद करण्याची मागणी करीत आहोत तर या धंद्यांना लगाम नाही लागल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने देण्यात आला.