(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा)
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माध्यमांमध्ये चर्चा आहे. या संदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना विचारणा केली असता राऊत यांनी, सरकारने कोणत्याहीप्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्या संदर्भात सांगितले नसून ही अफवा असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
“नाराजीबद्दल तुम्हाला सरकारकडून कळवण्यात आले आहे का? अफवांवर विश्वास ठेवू नका ?” अफवा पसरवणे हा गुन्हा आहे. शरद पवार हे काही दिवस आजारी होते त्यानंतर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना भेटले. महाराष्ट्रात अनेक विषय आहेत. मराठा आरक्षण ,पदोन्नती आरक्षण, कोरोना असे अनेक विषय आहेत” असे राऊत म्हणाले. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. शरद पवार यांचा या सरकारला पूर्ण आशीर्वाद आहे, असेही राऊत म्हणाले.