मुंबई राजमुद्रा दर्पण | राज्याच्या विधानसभेत अध्यक्ष मिळू नये अशी भाजपची भूमिका असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आता पुन्हा एकदा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदर्भात तसेच बदलण्यात आलेल्या नियमात संदर्भात अहवाल पाठविण्यात आलेला आहे. बारा आमदार निवडीच्या प्रकरणावरून अद्यापपर्यंत विषय राज्यपालांकडे प्रलंबित असताना आता मात्र पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा चेंडू राज्यपाल यांच्या कोर्टात टाकला गेला आहे. यासंदर्भातील परवानगी मिळावी यासाठी राज्य शासनातील नेते मंडळी तसेच महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे.
भाजपवर नाना बरसले
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदर्भात रविवारी काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती, त्यानंतर आज पुन्हा पत्र पाठवण्यात आलेले आहे. मात्र याबाबत राज्यपालांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान जर राज्यपालांची पत्रावर तर ती आली नाही, तर संविधानिक पद्धतीने जे काही आम्हाला करता येणे शक्य आहे ते सर्व आम्ही करू असं नाना पटोले यांनी इशारा दिला आहे राज्यपालांना आडून विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नये अशी भाजपची भूमिका असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
दरम्यान विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक उद्याच घेण्याची सरकारची तयारी आहे. अध्यक्षपदाची निवडणूक ही आवाजी मतदान यांनी घेण्याचा जो निर्णय घेतला आहे. तो घटनाबाह्य नसल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. नियम बदलण्याचा अधिकार विधिमंडळाला आहे त्यानुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी चे नियम बदल करण्यात आलेल्या आहे. आवाजी मतदानाने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची परंपरा लोकसभेतही आहे ती प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने अवलंबलेली आहे, व स्वीकारली आहे. इतर राज्यातही तीच परंपरा पाळली जाते महाराष्ट्रातील विधान परिषद सभापती चे निवडणुका वाजे पद्धतीनेच होते. त्यामुळे विधीमंडळात घेतलेला निर्णय घटनाबाह्य असून तसे पत्र राज्यपालांना पाठवलेले आहे. असे कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
राज्य शासनाच्या पहिला पत्राबाबत राज्यपालांची भूमिका
जे काही नियम विधानसभा चालवण्यासाठी लागतात त्यानुसार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सर्व कारवाई केली जात असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे. दरम्यान विधिमंडळात केलेल्या नियमबाह्य असल्याचा आक्षेप राज्यपालांनी नोंदवला होता. याबाबत विधिमंडळात घेण्यात आलेल्या निर्णयाचा स्पष्ट उल्लेख करून हे नियम कसे बरोबर आहेत, हे त्यांना पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न कॉंग्रेस नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आला आहे. राज्यपालांनी विधानसभेचे कामकाज आज सरकारला सहकार्य करावे अशी विनंती देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.