जळगाव / चाळीसगाव | छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमुळे महाराष्ट्राची ओळख दिल्लीत व इतिहासात वेगळी आहे. ‘देवेंद्रजी, उद्या मुख्यमंत्री व्हाल,पंतप्रधान व्हाल पण मात्र, महाराजांच्या राज्यात मराठा, ओबीसी व अन्य आरक्षणासाठी आपण आपआपसात भांडत आहोत, यामुळे दिल्लीत व इतर ठिकाणी खासदारांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू आहे. आम्ही असलो तरी आम्हाला विचारलं जात महाराष्ट्रात काय चालू आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी चाळीसगाव कार्यक्रमा प्रसंगीं राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हटले आहे.
राज्यात सध्या मराठा ओबीसी धनगर व इतर समाजाच्या आरक्षणासाठी तीव्र लढा सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण नेहमी गरम तव्यावर तारखेचा असलेले दिसून येते. याचे पडसाद दिल्लीत देखील उमटत आहे. महाराष्ट्र देशाच्या केंद्रस्थानी असल्यामुळे मुंबईत होणारी आंदोलने याची दखल थेट दिल्ली दरबारी घेतली जाते, मराठा आरक्षण तसेच ओबीसी आरक्षण हे सध्याचे राज्यातील प्रमुख मुद्दे आहे. यासाठी दोन्ही समाज वेगवेगळ्या पद्धतीने आपला लढा देत आहे. त्यासाठी वेगवेगळे नेतृत्व उदयास आली आहे. विविध सामाजिक संघटनांना कडून आंदोलने करण्यात येत आहेत.
मात्र राज्यात आरक्षणाचा तिढा सुटायला तयार नाही. यामुळे सत्तेतील महा विकास आघाडी सरकारला रोषाला देखील सामोरे जावे लागत आहे. मराठा व ओबीसी आरक्षण हे दोन्ही विषय जरी घेतले असले तरी राज्यातील सरकार विरोधात संघर्ष मात्र सुरू आहे. नेमकं याच मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून दिल्लीत चाललेले नेमकी चर्चा काय ? याबाबत आपल्या भाषणातून माहिती दिली आहे.