जामनेर राजमुद्रा दर्पण :- तालुक्यात सट्टा, जुगार, अवैध दारू असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले असुन, आठवडाभरात अवैध धंद्याना पोलिस प्रशासनाने लगाम न घातल्यास साखळी उपोषण करून तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आला.संजय गरूड, दगडु पाटील,विलास राजपुत, डॉ.प्रशांत पाटील, जितेश पाटील, राजेंद्र पाटील, अनिस पहेलवान, राजु नाईक,प्रल्हाद बोरसे,आदी सह पदाधिकारी व कार्यकर्ते निवेदन देताना हजर होते,तालका परिसरात अवैध धंद्याना ऊत आला असुन सर्व सामान्यांचे संसार उघड्यावर येण्याची वेळ आली असुन याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देवुन अवैध धंद्याना पायबंद घालावा. अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने साखळी उपोषण लावुन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा निवेदनात नमुद केला आहे