मुक्ताईनगर (प्रतिनिधी ) :-
मुक्ताईनगर शहरातील संत मुक्ताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 4 जानेवारी 2021 मंगळवार रोजी जळगांव जिल्हा पोलीस दल पोलीस स्थापना दिनानिमित्त ‘रेझिंग डे ‘ सप्ताह राबवित आहे. या वेळी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन ने संत मुक्ताबाई महाविद्यालयाच्या सभागृहात हा ‘रेझिंग डे ‘ विद्यार्थ्यांना समवेत साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय.डी.पाटील होते . आणि कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल खताळ होते. व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे शैक्षणिक सन्मवयक प्रा.एल.बी. गायकवाड,पो.हे.कॉ.गणेश मनुरे, पो.कॉ. मंगल साळुंखे,रविंद्र मेढे हे होते . कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पो.नि.राहुल खताळ यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर विषयी ममार्गदर्शन केले. तसेच सायबर क्राईम व महिला अत्याचर गुन्हा संबंधी महिती दिली. व पोलीस स्थापना दिनाचे महत्व सांगून पोलीस स्टेशनचे कामकाज कसे चालते याबाबत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.आय.डी.पाटील सर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. या वेळी कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रा. डॉ.रमेश शेवाळे , प्रा.डॉ.संदीप माळी, प्रा.के.पी.पाटील, प्रा. संजय सैंदाणें,प्रा. सोनवणे सर, प्रा.विरेंद्र जाधव व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अजित कुळकर्णी यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.वंदना लव्हाळे यांनी मानले.