फैजपूर प्रतिनिधी
दिनांक ४ जानेवारी रोजी फैजपूर नपा तर्फे दिव्यांग कल्याणकारी निधीचे वाटप करण्यात आले. फैजपूर नपाचे लेखापरिक्षक श्री.मंगलसिंग वतपाल यांचे हस्ते फैजपूर दिव्यांग सेना शहराध्यक्ष नितीन महाजन, तालुकाध्यक्ष योगेश (मुन्ना) चौधरी,उपाध्यक्ष ललित वाचुळदे,तालुका सचिव चेतन तळेले यांना प्रतिनिनिक स्वरूपात चेकचे वितरण करण्यात आले.सन २०२१ चे मंजुर यादीप्रमाणे संबंधित दिव्यांग बांधवांचे बँक खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली आहे.यावेळी नगरपरिषदेच्या अंतर्गत दिव्यांग बचत गट स्थापन करण्यात येणार आहेत.बचत गटाबाबत दिव्यांग बांधवांना सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. प्रविण सपकाळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच “माझी वसुंधरा अभियान” अंतर्गत सर्व दिव्यांग बांधवांनी शपथ घेतली.यावेळी लेखापरिक्षक श्री.मंगलसिंग वतपाल, लेखापाल श्री.निलेश दराडे, सहाय्यक श्री. प्रकल्प अधिकारी प्रविण सपकाळे,महीला समुदाय संघटक सौ.विद्या सरोदे, दिव्यांग सेना पदाधिकारी नितीन महाजन,योगेश (मुन्ना) चौधरी,चेतन तळेले,ललित वाघुळदे, अंकुर भारंबे, कुणाल वाघुळदे, युनुस तडवी, लोणार सरोवर दिव्यांग संघटनेचे तालुकाध्क्ष शे.अहसान शे.ईसा, रोहित तायडे, रोहित भारंबे, संजय वानखेडे, विनोद बि-हाडे, भिमराव मेढे, सुहासिनी चौधरी,अरुण सोनवणे,अशोक पाटील, अमिनाबी तांबट व शहरातील दिव्यांग बांधव ऊपस्थित होते.