भुसावळ –
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अनिल कुमार लाहोटी यांनी मध्य रेल्वेच्या १० कर्मचाऱ्यांना (तीन मुंबई विभागातील, प्रत्येकी दोन नागपूर, पुणे आणि भुसावळ विभागातील आणि एक सोलापूर विभागातील) त्यांच्या सतर्कतेचे कौतुक म्हणून “महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार” प्रदान केला. डिसेंबर २०२१ या महिन्यामध्ये अनुचित घटना टाळण्यात आणि ट्रेन ऑपरेशनमध्ये संरक्षितता सुनिश्चित करण्यात त्यांचे कर्तव्यनिष्ठ योगदानाबद्दल दि. ३.१.२०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात आले. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि रु.२०००/- रोख पुरस्कार आहे.
श्री सोपान पेढेकर, मास्टर क्राफ्ट्समन, कॅरेज आणि वॅगन वर्कशॉप, मुंबई विभाग यांनी देखभालीच्या कामादरम्यान गदग एक्स्प्रेसच्या एका डब्याच्या ट्रॉलीला तडे गेल्याचे लक्षात आले आणि डबा सेवेसाठी असुरक्षित असल्याचे घोषित करण्यात आला. त्यांच्या तत्परता व सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.श्री एस.के. ताराई, लोको पायलट आणि श्री सुभाष कुमार यादव, सहाय्यक लोको पायलट, दोघेही मुंबई विभागातील, दि. १.१२.२०२१ रोजी ट्रेन क्रमांक 17617 मध्ये कर्तव्यावर असताना त्यांना मुलुंड आणि ठाणे दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकमधून असामान्य आवाज ऐकू आला. त्यांनी तात्काळ ट्रेन थांबवून ट्रेन सुरक्षित असल्याची खात्री केली आणि ही बाब स्टेशन मॅनेजर, ठाणे यांना कळवली. परमनंट वे कर्मचार्यांनी तपासणी केली असता ट्रॅक असुरक्षित असल्याचे आढळून आले. त्यांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे पुढील ट्रेनला होणारा संभाव्य अपघात टळू शकला. श्री स्वप्नील सुरेश, पॅट्रोलमन, बडनेरा, भुसावळ विभाग यांना दि. १९.१.२०२१ रोजी रात्री गस्त घालताना किमी 633/23 येथे रूळाला तडा आढळून आला. त्यांनी तत्काळ सर्व संबंधितांना कळवले. त्यांनी अभियांत्रिकी पर्यवेक्षकासह दुरुस्ती केली आणि यामुळे संभाव्य अपघात टळला.
श्री वसंता प्रभाकर, गेटमन, बोदवड, भुसावळ विभाग दि. २६.११.२०२१ रोजी कर्तव्यावर असताना, मालगाडीमध्ये एक हॉट एक्सेल निदर्शनास आला. त्यांनी पुढच्या स्टेशनला अलर्ट केलं आणि हा प्रश्न तातडीने तिकडे पोहोचवण्यात आला त्यामुळे संभाव्य अपघात टळला. श्री राकेश कुमार, वरिष्ठ गुड्स गार्ड, नागपूर विभाग दि. १३.१२.२०२१ रोजी मालगाडीवर कर्तव्यावर असताना किमी 841/01 येथे लगतच्या ट्रॅकवर रेल्वे फ्रॅक्चर दिसले. त्यांनी तत्काळ स्टेशन व्यवस्थापक माजरी यांना कळवले. त्यामुळे या मार्गावर धावणारी ट्रेन सावधगिरीने चालवण्यात आली व संभाव्य अपघात टळला.श्री उमेश कुमार डोंगरे, ट्रॅकमन II, वर्धा, नागपूर विभाग यांनी दि. २५.१०.२०२१ रोजी आपले कर्तव्य बजावत असताना 750/19 किमी वर वर्धा – दहेगाव अप लाईनवर फ्रॅक्चर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी संबंधित अभियांत्रिकी अधिकार्यांना याची माहिती दिली. या मार्गावर येणारी ट्रेन सावधगिरीने मार्गस्थ झाली आणि संभाव्य अपघात टळला. श्री अजय कुमार, डेप्युटी स्टेशन मॅनेजर, हडपसर, पुणे विभाग, ट्रेन क्र. 11041 शी सिग्नलची देवाणघेवाण करत असताना लोकोच्या खाली स्पार्क होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ ट्रेन थांबवली. लोकोची तपासणी केल्यावर असे आढळून आले की, एक रॉड लटकत होता तो स्टेशनच्या कर्मचार्यांनी योग्य रित्या लावला आणि लोको पायलटने अनुचित प्रकार टाळला.श्री कृष्णा बसाक, कीमॅन, चिंचवड, पुणे विभाग यांना दि. १९.१२.२०२१ रोजी शंटीग नेकला फ्रॅक्चर झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी तत्काळ सर्व संबंधितांना कळवले आणि त्यामुळे संभाव्य अपघात टळला.श्री जितेंद्र कुमार, गुड्स गार्ड, सोलापूर विभाग दि. २०.१२.२०२१ रोजी मालगाडीवर कर्तव्यावर असताना त्यांना धक्का जाणवला आणि आवाजही आला. ही बाब सर्व संबंधितांना कळवण्यात आली आणि तपासणी केली असता त्यात रेल्वे फ्रॅक्चर आढळून आले. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला. यावेळी संबोधित करताना श्री अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, पुरस्कार विजेत्यांनी प्रशंसनीय काम केले आहे. संरक्षित कामासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेली २४ x ७ सतर्कता इतरांना प्रेरणा देईल आणि प्रवाशांच्या संरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करेल. श्री बी.के. दादाभोय, अतिरिक्त महाव्यवस्थापक आणि श्री विवेक गुप्ता, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी, श्री मुकुल जैन, प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक, श्री अश्वनी सक्सेना, प्रधान मुख्य अभियांत्रिकी आणि मध्य रेल्वेच्या इतर विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. सर्व विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यक्रमात व्हर्च्युअली सामील झाले. कार्यक्रमादरम्यान सर्व कोविड-१९ प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले.