जळगाव : प्रतिनिधी
शहरातील काही भागात कामांना सुरुवात झाली आहे. येत्या महिनाभरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत.
त्यामुळे रस्त्यांची कामे सुरू होण्यापूर्वीच पाणीपुरवठा विभागाने शहरातील जलवाहिनींना लागलेली गळती शोधून त्यांची दुरुस्ती करावी असे आदेश महापौर जयश्री महाजन यांनी दिले.
बुधवारी पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीदरम्यान शहरातील जलवाहिनींची स्थिती, कॉलनी परिसरात लागलेल्या गळतींवर चर्चा करण्यात आली.
आगामी काळात शहरात सर्वाधिक कामे ही रस्त्यांची आहेत. एकदा रस्त्याचे काम झाल्यानंतर
त्या ठिकाणी जलवाहिनीची गळती उघडकीस आल्यास पुन्हा खोदकाम करावे लागेल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी गळतींचा शोध घेऊन तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. अमृत अंतर्गत
जलवाहिनी टाकलेल्या भागात पुन्हा एकदा पाहणी करून नागरिकांना कनेक्शन देण्याचे आदेश
दिले.