भडगाव : प्रतिनिधी
शिक्षणविभाग महाराष्ट्र राज्य, आरोग्यविभाग, सलाम मुंबई फौंडेशन,जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, माऊली फाउंडेशन भडगाव,जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा यांचा सयुंक्त विदमाने जळगाव जिल्हा जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त शाळेचा होण्याचा दिशेने वाटचाल करीत आहेत त्या अनुषंगाने भडगाव तालुक्यात पंचायत समिती भडगाव येथे आज मा सचिन परदेशी(गट शिक्षणाधिकारी प.स.भडगाव) यांच्या नेतृत्वाखाली व जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त अभियान ब्रॅण्ड एम्बे सेडर व जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण समनव्य समिती सदस्य राज मोहम्मद खान शिकलगर यांचा प्रमुख उपस्थितीत तालुका स्तरीय तंबाखुमुक्त शाळा अभियान 9 निकष पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील मुख्याध्यापक यांची मिटिंग घेण्यात आली या मीटिंग मध्ये गणेश पाटील उदगीरकर (भडगाव तालुका समन्वयक,तंबाखू मुक्त शाळा अभियान) यांनी 9 निकष पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केले.त्यांनी त्यांची जि.प.शाळा आंचळगाव ही तालुक्यात प्रथम तंबाखू मुक्त शाळा केली त्या नंतर त्यांचे पिंपरखेड केंद्र जिल्यातील दुसरे तंबाखू मुक्त केंद्र केले व भडगाव तालुक्यातील उर्दू केंद्र जिल्यातील पाहिले तंबाखू मुक्त उर्दू केंद्र ठरले .जिल्यातील 160 शाळा पैकी 110 शाळा या त्यांच्या नेतृत्वाखाली तंबाखू मुक्त झल्या असून जळगाव जिल्यात भडगाव तालुका आघाडीवर आहे. भडगाव तालुका राज्यात पहिला तंबाखू मुक्त तालुका करण्याचा संकल्प केला.