चाळीसगाव:- प्रतिनिधी
दि.७ जानेवारी २०२२ रोजी येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय व राष्ट्रीय जुनियर कॉलेज चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा उद्घाटन समारंभ एकनाथरावजी खडसे, (माजी महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते नानासाहेब यांच्या प्रतिमेचे मल्यार्पण करून व दीप प्रज्वलन करून संपन्न झाला. संस्थेचे चेअरमन मा. बापुसो. डॉ. श्री. मुरलीधर भीवराव पाटील यांनी उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविले त्याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे व्हा.चेअरमन मा.दादासो. डॉ. संजय गोपाळराव देशमुख, सचिव मा. बापुसो. अरुण भीमराव निकम, संस्थेचे सहसचिव मा. आबासो. संजय रतनसिंग पाटील, ज्येष्ठ संचालक मा. आबासो. बा.वि. चव्हाण, आर्किटेक मा.बाळासो. धनंजय यशवंतराव चव्हाण, मा.आबासो, अविनाश देशमुख, मा.आबासो. सुधीर पुंडलिक पाटील, मा.नानासो. एल.टी.चव्हाण, मा.दादासो. विश्वास दगडू चव्हाण मा.आबासो. सुरेश स्वार, मा.बापूसो.अशोक खलाने,मा.बापूसो. प्रमोद पाटील,ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मा.किसनराव जोर्वेकर, डॉक्टर संजीव पाटील. पंचायत समितीचे सभापती मा.अजय पाटील,मा. प्रकाश दिनकरराव देशमुख, मा. भगवान अमरसिंह पाटील, मा. दीपक पाटील,मा.सुनील देशमुख, अरुण पाटील. राकेश नेवे. प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव, जुनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. शेखर बळवंतराव देशमुख, उपप्राचार्य प्रा. शरद धर्मा पाटील, उप प्राचार्य प्रा. एस. डी. महाजन, उपप्राचार्या डॉ. यु.आर.मगर उपप्राचार्य डॉ.जी.डी. देशमुख, परीक्षक डॉ. सुनील पाटील डॉ.वैभव सबनीस, एड. केतन सोनार तसेच पत्रकार बंधू,परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
मा. भाऊसो.श्री. एकनाथ रावजी खडसे उद्घाटकीय मनोगता प्रसंगी म्हणाले “शिक्षणाचा प्रसार गावपातळीवर झालेला नव्हता म्हणून नानासाहेब यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा येथे चालविला. त्यांनी जर वकिलीचा व्यवसाय केला असता तर प्रतिष्ठा त्यांना मिळाली असती, परंतु वैयक्तिक प्रतिष्ठेला महत्त्व न देता त्यांनी गाव पातळीवर शिक्षण पोचविण्यासाठी उत्कृष्ट असे कार्य केले.”इवलेसे रोप लावियेले द्वारी।तयाचा वेलू गेला गगनावरी। शिक्षणाचे रोप छोटेशे लावले पण त्याचा विस्तार आज चौफेर आपल्याला होताना दिसून येतोय. परिसरातील लोक शिक्षण घेऊन मोठे होत आहेत, अशी शैक्षणिक दृष्टी नानासाहेबांना लाभली होती. सानेगुरुजी, राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे या कर्तृत्ववान आणि विचारी माणसांच्या सहवासाने नानासाहेबांची दृष्टी सुद्धा मोठी झालेली होती. माणसे कर्तृत्वाने मोठी होतात, कर्तृत्वाने नावलौकिक होतो, हजारो वर्षे नाव राहते ते खर्या कर्मवीरांचे. आदराने आणि सन्मानाने नानासाहेबांचे नाव घेतले जाईल. या परिसरात बेरोजगारांना काम, शिपाई पदापासून तर प्राध्यापक पदापर्यंत नोकरी दिली. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवला. हीच खरी प्रतिष्ठा आणि मानसन्मान नानासाहेबांनी प्राप्त केली. तसेच भाऊसाहेब एकनाथ रावजी खडसे पुढे म्हणाले की, पूर्वी संस्थेसाठी जागा मिळविणे त्याचप्रमाणे संस्था उभारणीसाठी पैसा उभा करणे हे खूप मोठे आव्हानात्मक काम होते. एक रुपया वर्गणीसाठी सुद्धा वाट पाहावी लागत होती. समाजासाठी अशा काही धुरीणांनी हात सुद्धा पसरला तो गोरगरिबांच्या शिक्षणासाठी. त्यांची तळमळ होती की आपल्या संस्थेतून, परिसरातून डॉक्टर, इंजिनीअर वकील, शिक्षक तयार झाले पाहिजे.
नानासाहेबांनी या परिसरात ज्या शैक्षणिक संस्था उभ्या केलेल्या आहेत,त्यांचा पाया खोदणे, दगड,विटा, रेती, सिमेंट टाकून पाया मजबूत केला, हे काम म्हणजे शैक्षणिक पाया मजबूत करण्याचे काम नानासाहेबांनी केलं. ते तेवढ्यावरच थांबले नाहीत तर विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी पालकांचा विश्वास संपादन केला. त्याचप्रमाणे शिक्षकांनाही, कर्मचाऱ्यांनाही ज्ञान संपन्न होण्यासाठी सूचना केल्या. तसेच महात्मा गांधी आणि नानासाहेबांच्या विचारांप्रमाणे संस्था चालल्या पाहिजेत.अशी अपेक्षा व्यक्त केली.
श्री खडसे यांनी वकृत्व कलेचे महत्त्व आपल्या मनोगतातून विशद केले. वकृत्व म्हणजे काय ?”अर्ध्या तासाचे भाषण जो पाच मिनिटात उत्कृष्ट मांडणी करून समजावून सांगेल, श्रोत्यांच्या मनावर बिंबविल ते खरे वक्तृत्व” लाखो लोकांच्या मनावर आवाज, कृतीयुक्त विचार पोहोचविण्यासाठी संधी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. हजारो विद्यार्थी वक्तृत्वाने तयार होतील. विद्यार्थी तयार झाला तर या वकृत्व स्पर्धेचे नक्कीच सार्थक होईल असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपण किती बोलतो याला महत्त्व नाही तर आपण किती अभ्यासपूर्ण बोलतो हे अतिशय महत्त्वाचे असते. दरवर्षी स्पर्धा सुरू ठेवा, विद्यार्थ्यांना घडवा, संधी द्या, त्यांना सभाधीटपणा प्राप्त करून द्या, त्यांच्यातले वकृत्व गुण विकसित करण्यासाठी महत्वपूर्ण आव्हानही केले.तसेच महाविद्यालयाची शैक्षणिक प्रगती, सांस्कृतिक उपक्रम कार्यक्रम व महाविद्यालयाच्या आणि संस्थेच्या कामकाजाबद्दल गौरवोद्गार काढले.
तसेच सेवानिवृत्त प्राध्यापक व्ही. जी. पाटील आणि जालिंदर जगताप यांनी नानासाहेब यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
सदर उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष,संस्थेचे चेअरमन मा. बापूसाहेब डॉ. मुरलीधर भीवराव पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतातून नानासाहेबांच्या यशस्वी कारकीर्दीवर प्रकाश टाकला.समाजात वावरताना आपण काय केले पाहिजे? संस्था मोठी करण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजे.आपली संस्था प्रगतीकडे यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. तसेच महाविद्यालयातील प्रशासन व कामकाज याबद्दल प्रशंशा केली. तसेच स्पर्धक, संघ व्यवस्थापक प्राध्यापक, परीक्षक या सर्वांना स्पर्धा यशस्वीतेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
स्पर्धा उद्घाटन प्रसंगी समारंभाच्या प्रमुख अतिथींचे संस्थाचालक प्राचार्य व उपप्राचार्य यांनी स्वागत व सत्कार केला. तसेच परीक्षक डॉक्टर सुनील पाटील ,डॉक्टर वैभव सबनीस, एड. केतन सोनार,स्मृतिचिन्ह तयार करणारे कलावंत दिपक शंकर सोनवणे यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. आर. जाधव यांनी केले. प्रास्ताविकातून नानासाहेबांचा जीवन पट व तसेच महाविद्यालयाच्या विकासाचा उंचावणारा आलेख सादर केला. सूत्रसंचालन मा. श्री. मुकेश पवार यांनी तर आभार प्रा. डॉ. मनोज शितोळे यांनी व्यक्त केले. सारिका कुलकर्णी यांनी ईशस्तवन ,स्वागत गीत सादर केले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस. आर. जाधव, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. शेखर बी. देशमुख, उप प्राचार्य डॉ. एस.डी. महाजन, डॉ. यू. आर. मगर, डॉ. जी. डी. देशमुख, प्रा. एस.डी. पाटील, महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी,उत्तम वक्ता,पत्रकार, आणि सूत्रसंचालक मा. श्री. मुकेश पवार, प्राध्यापक बंधू-भगिनी शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.