जळगांव राजमुद्रा वृत्तसेवा | तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रा नशिरबाद अंतर्गत नशिराबाद व कुसुंबा येथे
शुक्रवार पासून १५ ते १८ वयोगटातील मुला – मुलींच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.
माननीय श्री लालचंद भाऊ पाटील उपाध्यक्ष जिल्हा परिषद जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार यांचे आदेशानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद अंतर्गत सार्वजनिक वाचनालय येथे १५ ते १९ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे कोवॅक्सीन लस देऊन मुला मुलींचे लसीकरण कार्यक्रम यांचे उद्घाटन पंचायत समितीच्या सदस्या सौ यमुनाबाई रोटे यांच्या हस्ते करण्यात आले
सदरील कार्यक्रमास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय चव्हाण नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ इरेश पाटील रुग्ण कल्याण समिती सदस्य ललित ब-हाटे, दीपक सोनवणे, डॉ नजरूल यांच्यासह सार्वजनिक वाचनालयाचे कार्याध्यक्ष बी आर खंडारे, डॉ प्रमोद आमोदकर, जितेंद्र महाजन सर, मिठाराम वाघुळदे ग्रंथपाल, संजय कावळे उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. पी. डी. कोळी (आरोग्य सहाय्यक), श्री. डी. के. तायडे (आरोग्य सेवक ), श्रीमती साळुंके व सौ लोखंडे (आरोग्यसेविका), श्री. एस. ए. महाजन (विस्तार अधिकारी पंचायत समिती जळगाव ),श्री.मनोज महाजन, (आरोग्य सेवक), श्री. मनोज भंगाळे,जळगाव यांच्यासह नशिराबाद येथील आशासेविका उपस्थित होत्या
त्यानंतर कुसुबा गावातील श्री स्वामी समर्थ विद्यालयात १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींना कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून दिली. त्यामुळे गावातील मुला-मुलींना लस घेणे अधिक सोपे झाले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रमोद घुगे, प्रा. श्री. भाऊसाहेब सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण, वैदयकीय आधिकारी डॉ. इरेश पाटील, डॉ. चेतन अग्निहोत्री, डॉ. विकास जोशी, डॉ.जयश्री सोनार, डॉ. सुषमा महाजन, शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली भदाणे, प्रा.हेमंत सोनार, प्रा. सुनील ढाकणे सर्व आशाताई, चालक राजाराम पाचपांडे आदींनी परीश्रम घेतले. आरोग्य विभागाने १५ ते १८ वयोगटातील मुलां, मुलींना लस उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले.
139 लाभार्थीना लसीकरणाची लाभ घेतला