जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा |जिल्हाधिकारी अभिजित राऊत,मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्थ केयर वर्कर्स, फ्रंट लाईन वर्कर्स व वय वर्षे ६० वरील सहव्याधी असलेले नागरिक यांच्या प्रिकॉशन डोसला सुरवात करण्यात आली असुन
जामनेर तालुक्यातील कचरूलाल बोहरा यांना ६० वर्षांवरील नागरिकांचा पहिला प्रिकॉशन डोस देण्यात आला.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे, डॉ.हर्षल चांदा,मुख्याधिकारी नगर पालिका चंद्रकांत भोसले,वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज पाटील,डॉ.पल्लवी राऊत,डॉ.सागर पाटील,गटनेते न.पा.जामनेर डॉ.प्रशांत भोंडे,नगरसेवक सुहास पाटील,सुहास चौधरी,तालुका मलेरिया पर्यवेक्षक व्ही.एच.माळी,आरोग्य साहाय्यक पुंडलिक पवार, सुनील पाटील,आरोग्य सेविका कविता नवघरे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्या हेल्थ केयर वर्कर्स, फ्रंट लाईन वर्कर्स व ६० वर्षे वरील सह व्याधी असलेल्याना दुसरा डोस घेऊन ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेले असतील अशा लाभार्थींनाच प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे.
अशा लाभार्थ्यांना कोव्हीन सिस्टीम मधून प्रिकॉशन डोस घेण्यासाठी पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी दिलेल्या मोबाईल नंबर वर एस एम एस प्राप्त होणार आहे.
पूर्वी नोंदणी न केलेल्या हेल्थ केयर वर्कर्स फ्रंट लाईन वर्कर्स यांना विहित नमुन्यात नोकरी च्या ठिकाणचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
जामनेर तालुक्यात एकूण १५८६ हेल्थ केयर वर्कर्स,३०१९ फ्रंट लाईन वर्कर्स व २५३१४ साठ वर्षे वा अधिक वयाच्या सहव्याधी असलेल्या लाभार्थींना प्रिकॉशन डोस देण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनवणे यांनी दिली.