जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव शहरातील नेरी नाका परिसरात स्मशानभूमी समोरचा जुन्या फर्निचरच्या दुकानाला आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आगीत दुकानातील सर्व सामान जळून राखरांगोळी झाला असून अग्निशामकचे पाच बंब पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे.
नेरी नाक्याजवळील स्मशानभूमीच्या समोर सालार नगर येथील रहिवासी दस्तगीर शाह रज्जाक शाह यांचे जुन्या फर्निचरचे दुकान असून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुकानाला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले आहे. सायंकाळी साडेपाच नंतर दुकान बंद केल्यावर कोणी तरी आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दुकानामध्ये कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी नसताना अचानक आग कशी काय लागली? असा सवाल शाह यांनी उपस्थित केला आहे. आगीत संपूर्ण दुकानातील सामान भासमसात झाला असून जवळजवळ ५ ते ७ लाखाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सदर घटनास्थळी महापौर जयश्री महाजन उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भेट दिली असून सदर परिस्थितीची पाहणी केली आहे. मालक दस्तगीर शाह यांच्याशी विचारपूस करून त्यांना सांत्वन देण्यात आले. पंचनामा करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले. मालक दस्तगिर शाह यांनी मदतीची अपेक्षा महापौर उपमहापौर यांच्या समोर व्यक्त केली आहे.