शेंदुर्णी ता.जामनेर,
शेंदुर्णी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाची आज गुरुवारी निवड होणार असुन ठरल्याप्रमाणे वार्ड क्रमांक १२ मधुन भाजपचे निवडुन आलेले नगरसेवक निलेश उत्तमराव थोरात यांची निवड निश्चित मानली जात आहे.
पहिल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत माजी मंत्री आ.गिरिशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत भाजपला लोकनियुक्त नगराध्यक्षा सह स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
प्रथम नगराध्यक्षा म्हणुन सौ.विजयाताई अमृत खलसे तर उपनगराध्यक्षा म्हणुन सौ.चंदाबाई गोविंद अग्रवाल यांची निवड झाली होती.
आ.गिरिशभाऊ महाजन यांनी सांगितले प्रमाणे व ठरलेल्या कार्यक्रमानुसार उपनगराध्यक्षा सौ.चंदाबाई गोविंद अग्रवाल यांनी आपल्या उपनगराध्यक्षा पदाचा राजीनामा दिला आहे यामुळे रिक्त झालेल्या जागेवर आज निवडणुक होणार आहे. यासाठी भाजपचे युवा नगरसेवक, भाजपचे जेष्ठ नेते उत्तमराव थोरात यांचे चिरंजीव निलेश उत्तमराव थोरात यांना भाजपच्या वतीने संधी देण्यात आली असुन ते उपनगराध्यक्ष पदासाठी आपला अर्ज दाखल करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व इंदिरा काग्रेसचे मिळुन नगरपंचायती मध्ये चार नगरसेवक आहे. त्यांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल होतो कि बिनविरोध निवड होते हे काल स्पष्ट होईल.
गुरुवारी सकाळी १०ते दुपारी१२ वाजेपर्यंत नामनिर्देशित पत्र दाखल केले जातील १२-३० वाजता अर्जाची छाननी व १२-३० ते १२-४५ या दरम्यान माघारीची मुदत आहे. या निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणुन जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे तर सहाय्यक म्हणुन शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी हे काम पाहणार आहे.