जळगाव राजमुद्रा दर्पण | विद्यार्थ्यांच्या भविष्याच वाटोळं करणारं विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) सरकारने त्वरित मागे घ्यावे या मागणी करिता जळगाव चे पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानासमोर निषेध रांगोळी काढून जळगाव भाजपा युवा मोर्चाने निषेध व्यक्त केला.
आज भाजयुमोच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात मंत्र्यांच्या घराबाहेर निषेध रांगोळ्या काढून हे काळे विधेयक मागे घेण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.जो पर्यंत हे काळे विधेयक मागे घेतले जाणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांसाठी हा संघर्ष सुरूच राहील असा इशारा देण्यात आला आहे.
हे आंदोलन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन यांच्या नेतृत्वात, प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील,प्रदेश सचिव भैरवी वाघ- पलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.या प्रसंगी जळगाव युवा मोर्चा चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.