जळगाव राजमुद्रा दर्पण | जिल्ह्यात विविध वक्तव्यावरून राजकारणामध्ये वातावरण पेटलेला दिसून येत आहे. भाजपाचे ह. भ. प ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांच्या वक्तव्यावरून युवासेना चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट जळकेकर यांना इशारा देत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माफी मागावी अन्यथा जिल्ह्यात फिरू दिले जाणार नाही असे म्हटले आहे. यावरून अद्याप पर्यंत भाजप मधील एकाही पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया आली नसून मात्र यामुळे मोठा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
ह. भ. प ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांनी आयोजित केलेल्या गिरणार परिक्रमा प्रसंगी पाचोरा तालुक्यातील एका गावांमध्ये गावकऱ्यांना संबोधित करताना थेट पालकमंत्र्यांवर निशाणा साधला यामध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या धाकाने चालू रेल्वेतून उडी मारली असा खळबळजनक गौप्यस्फोट पालकमंत्र्यांन बाबत केला तसेच माजलेलं रक्त काढण्याची वेळ आली असल्याचे पालकमंत्र्यांचे नाव न घेता जळकेकर यांनी टीका केली असल्याचा आरोप युवा सेनेचा आहे. यामुळे हा वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे.
युवा सेनेचे इशारा पत्रक
कथित गिरणा परिक्रमे दरम्यान जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री शिवसेनेचे मुलुख मैदान तोफ ना.श्री.गुलरावजी पाटील यांच्यावर बेताल वक्तव्य करणारे तसेच अल्पसंख्य व बहुजनात तेढ निर्माण करणारे व समाजात गैर समज पसरविणारे ज्ञानेश्वर पाटील उर्फ जळकेकर महाराज यांनी माफी मागावी अन्यथा युवासेना त्यांना जिल्ह्यात फिरू देणार असा इशारा युवासेना जळगाव तर्फे देण्यात आला आहे.
आपण महाराज आहात, समाजाला योग्य दिशा दाखवणे, शिस्त लावणे हे आपला कार्य आहे. समाज आपल्याकडून प्रेरणा घेत असतो तरी सुद्धा अध्यात्माचे कार्य सोडून, समाजात गैर समज पसरवून अपशब्द वापरणे आपणास शोभत नाही. असा प्रकार युवासेना खपवून घेणार नाही. जळगाव जिल्ह्यात आम्हाला बेजबाबदार नारायण नको. राजकारण करायचे असल्यास समोरा-समोर भिडावे, पोकळ धमकी देऊ नये. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, जश्याला तशे उत्तर देतां येतं. माफी मागावी अन्यथा परिणामासाठी तय्यार असावे, ही युवासेना आहे. तोंड सांभाळून बोलायचं आपल्या क्रूर व सूड बुद्धीचा प्रदर्शन सार्वजनिक करू नये. जिल्ह्याला विकास हवा, आपले सारखे समाज कंटक कदापी सहन केले जाणार नाही. अशा आशयाचे पत्रक युवासेना सचिव विराज कावडीया यांनी काढले आहे.