जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | तालुक्यातील वैजनाथ येथील गिरणा नदी पात्रातील गट नंबर १०५ ते १०८ या वाळू गटामधून ठेकेदाराने अमाप वाळू उफासा केल्याची तक्रार अँड विजय भास्कराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती, त्या पार्श्वभूमीवर खनिकर्म सह महसूल विभागातील एकूण सहा प्रमुख विभागाचे पथक वाळू गटाच्या मोजमाप व चौकशी करीता गठीत करण्यात आले आहे.
दरम्यान, मौजे वैजनाथ. ता. एरंडोल येथील गट नं १०५ ते १०८ जवळच्या गिरणा पात्रातील रेती गटांची तपासणी आणि मोजणी करण्याच्या कामे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा बाळ सनियंत्रण समिती यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, भूमिअभिलेख विभागाचे उपाधीक्षक, गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, भूजल सर्वेक्षण तसेच विकास यंत्रणा विभागाचे भूवैज्ञानिक, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांचे पथक तयार करण्यात आले असून तारीख उद्या (ता २८) सकाळी आठ वाजेला तपासणी आणि मोजणी केली जाणार आहे. पथकातील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना तपासणीचे तसेच मोजणीचे साहित्य घेऊन आवश्यक लेखासह उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.