राजमुद्रा दर्पण :- नेहरू युवा केंद्र जळगाव व समिधा प्रतिष्ठान जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भडगाव येथील रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयात युवकांसाठी अभिनव कार्यशाळा संपन्न झाली. आपल्या आयुष्यातील आव्हानांन पासून आपण काय शिकू शकतो यावर लक्ष केंद्रित करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण आपण दुसऱ्यांच्या आयुष्याला कसा अर्थ द्यायला हवा व आरोग्य संपन्न जीवनशैली तसेच स्पर्धा परीक्षा आणि आत्महत्या, आजचा युवक दिशा आणि दिशा ,समाजभान व आजचा युवक या विषयांवर उत्कृष्ट लेखक, ब्लॉगर वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद प्रदेश प्रवक्ता पंकज रणदिवे, युवा व्याख्याते हर्षल पाटील, सामाजिक कार्यकर्त्या योगिनी पाटील,या मान्यवरांनी कार्यशाळेत युवकांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच मा.प्राचार्य डॉ.गायकवाड सरांनी अध्यक्षीय भाषण केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक नेहा मालपुरे तर समिधा प्रतिष्ठान संस्थापक दिव्या भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन नानासाहेब व प्राचार्य. डॉ. गायकवाड सर यांचे विशेष सहकार्य लाभले.हा संपूर्ण कार्यक्रम कोविडचे सर्व नियम पाळून आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी भूषण पाटील, नेहा मालपुरे, अश्विनी सोमवंशी, प्रतीक पाटील यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन अश्विनी सोमवंशी तर आभार नेहा मालपुरे यांनी मानले.