जामनेर राजमुद्रा दर्पण :- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अखिल विश्वातील भारताचे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या संदर्भात एकेरी वक्तव्य करून अपमानास्पद उच्चार केला. तसेच त्यांच्या गुरूच्या संदर्भात वादग्रस्त विधान करून चुकीचे विधान केले. याच्या निषेधार्थ जामनेर येथे १ मार्च रोजी निषेध मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जामनेर तालुक्यातील सर्वपक्षीय शिवप्रेमी मंडळींनी दिली.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी नवीनच वादग्रस्त विधान केले. छत्रपती शिवराय यांच्यावर खरे संस्कार करण्याचे काम आईसाहेब जिजाऊ राजे भोसले यांनी केले आहे. त्याच छत्रपतींच्या खऱ्या गुरु आहेत. धार्मिक दृष्टीकोनातून छत्रपती शिवरायांचे गुरु महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे आहेत. न्यायालयाच्या निर्णया मधुन आणि संशोधनातून हे वारंवार सिद्ध झाले आहेत. तरीसुद्धा शिवरायांबद्दल खोटे विधान करून शिवप्रेमींच्या भावना दुखविण्याचा चे काम राज्यपालांनी केले आहे. राज्यपालांनी बुद्धी परस्पर शिवरायांचा केलेला हा उपमर्द महाराजांचा झालेला अपमान कोणीही सहन करणार नाही.त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ जामनेर येथे सर्वपक्षीय छत्रपती शिवराय प्रेमींच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सर्वपक्षीय शिवप्रेमींनी एका पत्रकाद्वारे दिली.
दिनांक १मार्च मंगळवारी दुपारी १२ वाजता नगरपालिका समोरील जिजाऊ चौकात सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.